+91 99225-04539
img

Chairpersons Message

Straight from the heart

Dear Students/ Parents,

Successful and happy individuals build a successful nation.But what is it that aids success, achivment of goals and fulfillment of your mission to lead a happy and contended life? That strong foundation is none other than good education , because in education lils biggest service to the individual , to the nation and to humanity the word over, You may be aware about the activities of P K Foundation that established with an objective to provide quality education from school to post graduation programs in all disciplines, The students fired with determination to excel,a competent and dedicated faculty , meticulously designed curriculum and the optimum infrastructure , the P K Technical campus has to grow in the word of education . My target is to equip each and every student of the P K Technical Campus with the best education and infrastructure to help them achieve nothing but the best in life. Not only do we inculcate in them the best of creative and technical qualifications , we also teach them indispensable human qualities. We always welcome and quickly respond to new suggestions and innovative ideas to upgrade the quality of Education, If you desire to know more, please do not hesitate to visit our campus.

Mr. Pratap Khandebharad

Founder President

थेटअंतःकरणापासून
प्रियविद्यार्थी, शिक्षक, पालक यांससप्रेमनमस्कार!

मानवी जीवना मध्ये सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी अत्याव्यक गोष्ट कोणती किजी जीवनात यशपुर्ती ध्येयपूर्ती ,कार्यसिद्धी करता मदत करते. तरती गोष्ट म्हणजे दुसरे - तिसरे काही नसून 'शिक्षण' हिहोय. उत्तम शिक्षण हेच समाज ,राष्ट्र ,आणि मानवते साठी ची उत्तम सेवा आहे. तसेच सर्व सुधारणा व सर्व समस्या च निराकरण करण्याचं सामर्थ्य शिक्षणातच दडलंय. म्हणून आम्ही पीके फाऊंडेशन अंतर्गत चालणाऱ्या शिक्षन शाखांच्या माध्यमातून, मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत करत प्राथमिकते तंत्रशिक्षणासह पदव्यूत्तर स्तरापर्यंतचे दर्जेदार शिक्षण समाजातील विविध घटकां पर्यंत पोहचविण्याचा प्रयन्त करत आहोत. तसेच यासुसंस्कृत देशाची सांस्कृतिक सिद्धताहि उपेक्षित - दुर्लक्षित .अंध,अपंग, मतिमंद, गतिमंद सह तत्सम घटकांच्या उन्नती मधे सामावलेली आहे. म्हणूनच संस्थेमार्फत मोफत स्वरूपात मतिमंदमुलांची निवासी/अनिवासी शाळा चालवून त्यांना त्यांचा हरवलेला आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा उद्दिष्टांकरिताच पीके फाऊंडेशन यासंस्थेची स्थापना करण्यात आली आहे. शिक्षणाने माणसाच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटतो. पण यशाचं अतिउच्चं शिखर गाठण्यासाठी शिक्षणा बरोबर संस्कार अतिमहत्त्वाचे असतात. 'संस्कारा शिवाय शिक्षणाला अर्थनाही' या तत्वाशी मी संपूर्ण सहमत असून, विद्यार्थ्यांना अध्यापकांच्या माध्यमातून संस्कार,व्यावसायिक कौशल्य, समय सूचकतेचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो आहे. मला केवळ पोशाखी विद्यार्थी बनविण्यात अजिबात स्वारस्य नाही. म्हणून येथे शिकणारा प्रत्येक विद्यार्थी ज्ञान व संस्काराच्या बाबतीत परिपूर्ण होवून,असेलत्या क्षेत्रातत्याने जीवनातील अतिउच्च शिखर गाठावे. हे एकमेव ध्येय मी माझ्या नजरे समोर ठेवले आहे. येथील विद्यार्थ्यांच्या अंगी फक्त तांत्रिक ज्ञान व सर्जनशील स्वभावच नाही तर त्याही पुढे तो एक उत्कृष्ट माणूस झाला पाहिजे. त्याला कर्तव्याची परिपूर्ण जण व सामाजिक भान असायला हवे. हि माझी अपेक्षा आहे. आज मानवजीवन ,कमी होत चाललेलं आयुर्मान यामुळे संधीची वाट बघणारा नव्हे तर संधी निर्माण करणारा युवक निर्माण करणे. तसेच नैतिकतेचे अधिष्ठान असणारा अत्यंत प्रामाणिक / सुसंस्कृत माणूस होण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. अशा उच्च ध्येयाने झपाटलेला विद्यार्थी घडविणे त्याचबरोबर बांधीलकी असणारे, समर्पीत वृत्तीचे शिक्षक बनविणे हेमी माझ्या समोरील सर्वातमोठे आव्हान समजतो. यातूनच व्यक्तीचा व समाजाचा उत्कर्ष साधने सहजशक्य आहे. यावर माझा संपूर्ण विश्वास असून. अशा उच्च ध्येयासाठी, सर्वसोयी -सुविधांयुक्त असणारी. आमुची संस्था शैक्षणिक विश्वात सक्षमपणे वाटचाल करीत आहे. मनाच्या गाभाऱ्यात पेटून ज्वाळा बाहेर पडलेल्या या शैक्षणिक यज्ञा विषयी अधिक जाणून घ्यावयाचे असल्यास आपण कधीही आमुच्या शैक्षणिक संकुलांस आवश्य भेट घ्यावी.

संस्थापक - अध्यक्ष

पीकेफाऊंडेशन